MPSC Qualification Exam Criteria Agelimit

MPSC

ABOUT MPSC 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission(MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात and with MPSC Qualification exam criteria agelimit all information providing is this page.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी): आयोगाविषयी माहिती

१. घटनात्मक तरतुद :

 • विविध स्तरांवरील प्रशासनाच्या यशस्वी कामकाजात लोकसेवकांची महत्वाची भुमिका असते. त्यामुळे लोकसेवकांची भरती, प्रशिक्षण, वित्तलब्धी, सेवाशर्ती, पदोन्नतीच धोरण इत्यादी बाबींना महत्व प्राप्त होते. लोकसेवकांशी संबंधित या सर्व बाबी नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी एका स्वतंत्र व तज्ञ प्राधिकारी यंत्रणेची आवश्यकता असते तिला लोकसेवा आयोग म्हणतात. भारतात केंद्र स्तरावर संघ लोकसेवा आयेाग तर राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतुद घटनेत केली आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ नुसार स्थापन केलेली महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यकारी पदासाठी योग्य उमेदवार उपलध करून देऊन त्यांना सेवा व सुलभ कार्यक्षमता प्रदान करते आणि विविध सेवाविषयक बाबींवर सल्ला देतात.

२. आयोगाची संरचना : कलम ३१६ अनुसार

 • राज्य लोकसेवा आयोगात एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवतील तेवढे सदस्य असतात.
 • सध्या एक अध्यक्ष व पाच सदस्य आहेत.

३. आयोगाचे कार्य व अधिकार :

 • राज्य लोकसेवांमध्ये नियुक्ती करण्याकरीता परीक्षा घेणे.
 • आयोग पुढील बाबींमध्ये राज्यसरकारला सल्ला देते.
  • नागरी सेंवामध्ये व नागरी पदांमध्ये भरती करण्याच्या पध्दती
  • नागरीसेवांमध्ये व पदांवर नियुक्ती करतांना आणि बडत्या देतांना एका सेवेतुन दुस:या सेवेत बदल्या करतांना राज्य सरकारला सल्ल देणे.
  • राज्यपालांनी आयोगाकडे विचारार्थ पाठविलेल्या अन्य कोणत्याही बाबींवर सल्ला देणे.
  • भरती व सेवा शर्ती, नागरी सेवकास बडतर्फ, पदावरून दुर करणे व पदावतन करणे.

एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा & ( MPSC Qualification exam criteria agelimit )

स्पर्धा परीक्षा – COMPETITIVE EXAMS

१. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा (Maharashtra State Services Examination)

२. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब परीक्षा (Maharashtra Subordinate Non-gazetted Gr. B service Exam)

3. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- क परीक्षा (Maharashtra Subordinate Non-gazetted Gr. C service Exam)

४ . महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)

५ . महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा Maharashtra (Maharashtra Agricultural Services Examination)

६ . महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा (Maharashtra Engineering Services Gr-A Examination)

७ . महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा  (Maharashtra Engineering Services Gr-A Examination)

८ . सहायक मोटार वाहन निरिक्षक परीक्षा  (Asstt. Motor Vehicle Inspector Exam)

९ .  दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा (MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam)

१०.  सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B)

सरळसेवा भरती

१. निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे , गट ब परीक्षा

२. लघुलेखक व लघु टंकलेखक (मराठी)  परीक्षा

३ . सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

४ . वैज्ञानिक अधिकारी, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

मर्यादित विभागीय परीक्षा

१. पोलिस उपनिरीक्षक

२. सहायक कक्ष अधिकारी

३. राज्य कर निरीक्षक

विभागीय परीक्षा

१. महाराष्ट्र वित्त  लेखासेवा वर्ग ३

२. महसुल अधिकारी

३. वन अधिकारी

४. विक्रीकर अधिकारी

पात्रता ( MPSC Qualification exam criteria agelimit )

MPSC Qualification exam criteria agelimit- वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.

yash logo

For any Enquiry or Detail related to Yash Academy or Courses offered by us you  can submit your details here to receive a free call from one of our expert.

Schedule Free Counselling

Quick Enquiry