State Civil Services Exam Eligibility & Syllabus

राज्यसेवा परिक्षेविषयी ( state service exam )

“महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) दरवर्षी महाराष्ट्र शासनात कार्य करणाया गट अ आणि गट ब (राजपत्रित) अधिकारी वर्गाची पदे भरण्यासाठी राज्यसेवा परिक्षा आयोजित करते. महाराष्ट्र स्तरावर प्रशासनामध्ये जाण्यासाठीची राज्यसेवा परिक्षा ही सर्वोच्च मानल्या जाते. राज्यसेवेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी, उपपोलिस अधिक्षक, तहसीलदार, सारखी पदे भरण्यात येते.
राज्यसेवा परिक्षा ही तीन टप्प्यामध्ये आयोग आयोजित करते.
१. पूर्व परिक्षा
२. मुख्य परिक्षा
३. मुलाखत

पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. त्यामध्ये दोन पेपर असतात.

पेपर-१ सामान्य अध्ययन भाग-१ असतो त्यात उमेदवारांचे विषय ज्ञान तपासले जाते. भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि भारताचा स्वातंत्रलढा, भूगोल, राज्यव्यवस्था आणि राज्यघटनेचा, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी हे उपघटक सामान्य अध्ययन भाग-१ मध्ये आहेत.

पेपर-२ नागरी सेवा कल चाचणी (CSAT) हा असतो. यामधे उमेदवारांचे आकलन आणि बुद्धिमत्ता सोबतच निर्णय क्षमता तपासली जाते. यात परिच्छेदावर (comprehenssion) आधारित प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता यांवर प्रश्न विचारले जाते. चार चुकीच्या उत्तराला एका बरोबर उत्तराचे गुण वजा केले जाते(१/४). एकूण पदसंख्ये च्या १४-१५ पट उमेदवार मेरीटनूसार मुख्य परिक्षेला पात्र ठरतात.

मुख्य परिक्षा ही लेखी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. एकुण ६ पेपर असतात.

पेपर क्र.१ व २ हे मराठी व इंग्रजी भाषांचे असतात तर पेपर क्र.३, ४, ५, व ६ हे सामान्य अध्ययन १, २, ३, व ४ असे अनुक्रमाने चार पेपर असतात.

पेपर क्र.१ – मराठी व इंग्रजी निबंध, लेखन भाषांतर आणि सारांश लेखन असते आणि हा पेपर लेखी स्वरूपाचा असतो.
पेपर क्र. २ – मराठी व इंग्रजी व्याकरण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते
पेपर क्र. ३ – सामान्य अध्ययन १ – भुगोल आणि इतिहास विषय,
पेपर क्र. ४ – सामान्य अध्ययन २ – राज्यव्यवस्था, राज्यघटना, प्रशासन, मानवाधिकार विषय
पेपर क्र. ५ – सामान्य अध्ययन ३ – मानव संसाधन विकास विषय आणि
पेपर क्र. ६ –  सामान्य अध्ययन ४ – अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान विषय असे स्वरूप असते.

सामान्य अध्ययनाचे चारही पेपर चे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. व चुकीच्या उत्तराला १/३ वजा गुण असतात. मुख्य  परीक्षेचया सर्व पेपरमध्ये (८०० गुणपैकी) मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारावर एकूण पदसंख्ये चया २ ते ३ पट उमेदवार मुलाखतीला बोलवले जाते. अंतिम निवड यादी मुख्य परिक्षेचे एकूण गुण (८०० गुणपैकी) आणि मुलाखतीत (१०० गुणपैकी) मिळालेले गुण मिळून जाहीर केली जाते.

राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जाणारी पदे

गट- अ राजपत्रित

१. उप जिल्हाधिकारी, गट-अ
२. पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, गट-अ
३. उपसंचालक/प्रकल्प अधिकारी
४. सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ
५. उपनिबंधक, सहकारी संस्था गट-अ
६. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ
७. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेख सेवा, गट-अ
८. मुख्य धिकारी, नगरपालिका / परिषद, गट-अ
९. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-अ
१०. शिक्षणाधिकरी, महाराष्ट्र शिक्षण सेवा
११. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास/सहायक आयुक्त
१२. उद्योग उप संचालक तांत्रिक
१३. तहसिलदार, गट-अ
१४. सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योग

गट-ब राजपत्रित

१. उप शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा
२. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब
३. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेख सेवा, गट-ब
४. कक्ष अधिकारी, गट-ब
५. सहायक गट विकास अधिकारी, गट-ब
६. मुख्यअधिकारी , नगरपालिका / नगर परिषद, गट-ब
७. सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब
८. उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब
९. उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब
१०. सहायक आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क, गट-ब
११. मार्गदर्शन अधिकारी कौशल्य विकास
१२. रोजगार व उद्योग मार्गदर्शन अधिकारी
१३. उद्योग अधिकारी, तांत्रिक विभाग
१४. नायब तहसिलदार, गट-ब

राज्य सेवा परीक्षेसाठी पात्रता व अटी   State Civil Services Exam Eligibility

१) नागरीकत्व – भारतीय नागरीकत्व

२) वयोमर्यादा-

 

३) शैक्षणिक अर्हता – पदवी , पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील

४) शारीरीक मोजमापे/अर्हता – पोलिस उपअधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क

state civil services exam eligibilit राज्य सेवा परीक्षेसाठी पात्रता व अटी

राज्यसेवा परीक्षा योजना state service exam

१. प्रस्तुत परीक्षा एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते

 टप्पा १. पूर्व परीक्षा (PRELIMINARY EXAMINATION)) – ४०० गुण
 टप्पा २. मुख्य परीक्षा (MAIN EXAMINATION) – ८०० गुण
 टप्पा ३. मुलाखत (INTERVIEW ) – १०० गुण

२. पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी घेण्यात येते. याकरिता पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमाारेषा किंवा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येते.

३. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत, तसेच, पूर्व परीक्षेचे गुण उमेदवारांना कळविले जात नाहीत.

४. मुख्य परीक्षेकरिता आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात.

५. जाहीरातीतील तरतुदीनुसार विहित अटींची पूर्तता करणा-या व मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते

राज्यसेवा परीक्षा योजना state service exam

राज्यसेवा पूर्व परीक्षा – योजना व अभ्यासक्रम

पुर्व परीक्षा योजना :-

१. परीक्षेचे टप्पे – एक लेखी परीक्षा एकुण गुण – ४००
२. प्रश्रपत्रिका – दोन
३. प्रश्रपत्रिकेचे स्वरूप

state public service commission exam

 

अभ्यासक्रम

पेपर – १. सामान्य अध्ययन

१. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी
२. भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र चळवळ महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित.
३. भारत व जगाचा भूगोल – प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित.
४. महाराष्ट्र व भारतीय राज्यपद्धती व प्रशासन – राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, नागरी प्रशासन, सार्वजनिक धोरण, मानवी हक्क संबंधीचे मुद्दे इत्यादी
५. आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास, दारिद्र, सर्वसमावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, इत्यादी
६. पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे – परिस्थितिकी, जैविक बहुविविधता व वातावरणातील बदल सदर विषयातील स्पेशलायझेशन दर्जाचे ज्ञान आवश्यक नाही
७. सामान्य विज्ञान .

पेपर – २. नागरी सेवा कलचाचणी -CSAT

१. आकलन – Comprehension
२. संवाद – कौशल्यासह अंतव्र्यक्तिगत कौशल्य – Interpersonal skills including communication skills.
३. तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता – Logical reasoning and analytical ability.
४. निर्णयक्षमता व समस्या निराकरण – Decision – making and problem – solving.
५. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – General mental ability.
६. मूलभूत अंकज्ञान(संख्या व त्यांचे संबंध, इयत्ता १०वीचा स्तर) Basic numeracy and Data interpretation
माहिती विश्लेषण (तक्ते, आलेख, टेबल, माहितीची परिपूर्णता – इयत्ता १० वी स्तर)
७. मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य ( इयत्ता १० वी व १२ वी स्तर) Comprehension

राज्यसेवा मुख्य परीक्षा – योजना व अभ्यासक्रम

  • विद्याथ्र्याच्या विविध विषयांच्या ज्ञानाची पडताळणी मुख्य परिक्षेत केली जाते.
  • मुख्य परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जातात, तसेच, मुख्य परीक्षेचे गुण उमेदवारांना कळविले जातात.
  • मुख्य परीक्षेकरिता आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात.

 

राज्य सेवा (मुख्य परीक्षा) – २०१६ पासून
State Service (Main) Examination – from 2016

 

सूचना :

१. सन २०१६ च्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षेपासून मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्रपत्रिकेचे स्परूप बदलण्यात आले असून सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे लागू राहील. सामान्य अध्ययन – I, II,III, IV विषयांच्या प्रश्रपित्रकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही
२. तीन चुकीच्या उत्तरानं करिता एका प्रश्राचे गुण वजा करण्यात येतील.

 

परीक्षा योजना

 

 

परीक्षेचे टप्पे :- लेखी परीक्षा ८०० गुण                                                                                                                                            प्रश्रपत्रिकांची संख्या :- सहा (अनिवार्य)

परीक्षा योजना state public service commission exam

पेपर क्र. १ मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्रपत्रिका राहिल. मात्र दोन्ही भागांसाठी दोन स्वतंत्र उत्तरपुस्तिका राहतील

state public service commission exam

पेपर क्र. २ मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्रपुस्तिका व उत्तरपत्रिका राहील.

state public service commission exam

 

अभ्यासक्रम

 

पेपर क्रमांक – १ मराठी व इंग्रजी (पारंपारिक/वर्णनात्मक)

पेपर क्रमांक - १ मराठी व इंग्रजी (पारंपारिक/वर्णनात्मक) state service exam

पेपर क्रमांक – २ मराठी व इंग्रजी (वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी)

पेपर क्रमांक - २ मराठी व इंग्रजी (वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी) state service exam

सामान्य अध्ययन – १
इतिहास व भूगोल

दर्जा: पदवी एकुण गुण: १५०                                                                                                                                              प्रश्रपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ कालावधी : २ तास

टीप :
(१)प्रश्रपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.
(२) उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयांतील / उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

१. इतिहास
१.१ ब्रिटिश सत्ते ची भारतात स्थापना : ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्तेचे विरूद्ध युद्धे, तैनाती फौज धोरण, खालसाकरणाचे धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश सत्तेचे रचना.
१.२ आधुनिक भारताचा इतिहास : आधुनिक शिक्षणाची ओळख – वृत्तपत्र, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक – धार्मिक सुधारणा आणि त्यांचा समाजावरील परिणाम.
१.३ प्रबोधन काळ :
१.३.१ सामाजिक – सांस्कृतिक बदल : ख्रिश्चन मिशनरींबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भुमिका, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७) सामाजिक – धार्मिक सुधारणांच्या चळवळी : ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन व थिऑसाफिकल सोसायटी.
१.३.२ शीख तसेच मुस्लिम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राम्हणतर चळवळ व जस्टीस पार्टी.

१.४ वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था- व्यापारीक टह्रश्वपा, संपत्तीचं चे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्तीचं वहन सिध्दांत, अनौद्योगीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा :हास, भारतीय कृषीव्यवस्थेचे वाणिज्यीकरण. आधुनिक उद्योगांचा उदय- भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटीश विषयी भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी (फंड)
व गो.कृ. गोखले यांचे योगदान.
१.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास : सामाजिक पाश्र्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्र व शिक्षण यांची भूमिका, १८५७ चा उठाव, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना(इंडियन नॅशनल काँग्रेस), मवाळ गटाचा काळ, जहाल गटाची वाढ, बंगालची फाळणी, होमरूल चळवळ, महत्वाच्या व्यक्तींची भुमिका- सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, ए.ओ.हयुम, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय,  बेंझट, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित
जवाहरलाल नेहरू व इतर.
१.६ ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिध्द उठाव
१.६.१ शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव- राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी.
१.६.२ क्रांतीकारी चळवळी – महाराष्ट्रातील बंड – वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाब मधील क्रांतीकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड,  येथील भारतीयांच्या क्रांतीकारी चळवळी, आझाद हिंद सेना.
१.६.३ साम्यवादी (डावी)चळवळ – साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळ.
१.७ गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन: गांधीजींचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व, गांधीजींच्यालोकचळवळी,असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, फै जपुर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन १९३६, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन, जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन, गांधीजींचा दृष्टीकोन, इतर प्रयत्न,संयुक्पक्ष(युनियनिस्ट पार्टी) व कृषक प्रजा पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचासहभाग, संस्थानातील जनतेच्या चळवळी.
१.८ ब्रिटीश प्रशासन अधीन घटनात्मक विकास – भारतीय परिषद कायदा- १८६१, भारतीय परिषद कायदा-१८९२, भारतीय परिषद कायदा-१९०९ (मोर्ले-मिंटो सुधारणा), भारत सरकारचा कायदा-१९१९(माँट फोर्ड सुधारणा), भारत सरकारचा कायदा-१९३५.
१.९ सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी- मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान व अलिगढचळवळ, मुस्लिम लीग व अली बंधू, इकबाल, जिन्हा), हिंदू महासभेचे राजकारण.
१.१० सातत्याचा हस्तांतरणाकडे – ऑगस्ट घोषणा-१९४०, क्रिह्रश्वस योजना-१९४२, वेव्हेल योजना-१९४५, कॅबिनेट मिशन योजना- १९४६, माउंटबॅटन योजना १९४७, भारतीय स्वातंत्र्यता कायदा-१९४७.
१.११ स्वातंत्र्योत्तर भारत : देशाच्या फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, राज्यांची भाषावर पुनर्रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महत्वांच्या राजकीय पक्षांचा सहभाग व त्यातील महत्वाच्या व्यक्ती, शेजारील देशांशी संबंध, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणामधील्र भूमिका :- अलिप्ततावादी धोरण- नेहरू, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी. भारताची कृषि,उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानांमधील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, बांगला देशाची मुक्तता, राज्यांतील संयुक्त सरकारे, विद्याथ्र्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि
आणीबाणी, काश्मिर, पंजाब व आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद व माओवाद, पर्यावरणविषयक चळवळ, महिलांची चळवळ आणि वांशिक चळवळ.
१.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक – त्यांची विचारप्रणाली व कार्य : गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षि शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या. का. त्र्यं.  तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळकृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे,विष्णुशास्त्री चिपळुणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णूबुवा ब्रहचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
१.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक) : कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इ. प्रायोगिक कला :- नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत व लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारुड व इतर लोकनृत्य. दृश्य कलावास्तु रचना, चित्रकला व वास्तुशिल्प, उत्सव. महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील वाडमय व संत वाङमयाचा प्रभाव:, भक्ती वाङमय, दलित वाङमय, नागरी व ग्रामीण वाङमय.
२. भूगोल – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
२.१ भुरूपशास्त्र : पृथ्वीचे अंतरंग, रचना आणि घटना – अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे. भूमीस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरूप चक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरूपे. भारतीय उपखंडाची उत्क्रांती वभूरूपशास्त्र. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग. महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथीलभुरूपीकीय वैशिष्टे. महाराष्ट्रातील नैसर्गिक  भुदृश्ये/भुमीस्वरूपे- टेकडया, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता(रांजण खळगे), धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण (बीचेस)
२.२ हवामानशास्त्र : वातावरण- संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे. सौरऊर्जा-पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन. तापमानपृथ्
वीपृष्ठावरील तापमानाचे उध्र्व व क्षितीज समांतर वितरण. हवेचा दाब-वारे, ग्रहीय व स्थानिक वारे. महाराष्ट्रातील मोसमी वारे(मान्सुन), पर्जन्याचे वितरण, अवर्षण, महापूर व त्यांच्याशी निगडीत
समस्या.
२.३ मानवी भुगोल : मानवी भूगोलातील विचारधारा – निश्चयवाद/निसर्गवाद, संभववाद/शक्यतावाद, असंभववाद/अशक्यतावाद, थांबा व पुढे  जा निश्चयवाद, विकाससंबंधीची विविध मते किंवा मतप्रणाली. मानवी वसाहत- ग्रामीण व नागरी वसाहत- स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे व त्यांची रचना. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील समस्या. ग्रामीण-नागरी झालर/किनार क्षेत्र. नागरीकरण- नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन.
२.४ आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) :
• आर्थिक व्यवसाय- शेती-महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप. उच्च उत्पन्न देणा:या जाती शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत श्ेाती, कृषीविषयक शासकीय धोरण.
• मासेमारी/मत्स्य व्यवसाय- भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण.
• खनिजे व ऊर्जा साधनसंपत्तीचं -महाराष्ट्रातीलप्रमुख खनिजे व उर्जा साधने, खनिज साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाच्या समस्या.

• वाहतूक-वाहतूकीचे प्रकार व महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास, जागतिकीकरण.
• पर्यटन- पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा (लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्प.)
• ज्ञानधिष्ठित आर्थिक व्यवसाय- ऋणपरमाणू संबंधी व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र(आय.टी.पार्क), भारतातील सिलीकॉन व्हॅली/माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैवतंत्रज्ञान भारतातील संशोधन व विकास संस्थेची (क्र&ष्ठ) भूमिका.

२.५ लोकसंख्या भुगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ): लोकसंख्या विषयक संख्या की साधने/माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्टये, लोकसंख्या बदलाचे घटक-जनन दर, मत्र्यता दर, लोकस्थलांतर, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यू दर आणि लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास, लोकसंख्या विषयक धोरण.
२.६ पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) : परिसंस्था-घटक: जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, पोषण/रासायनिक घटकद्रव्यांचे चक्रीकरण, अन्न साखळी/श्रृखंला, अन्न जाळे, पर्यावरणीय :हास व संधारण, जागतिक परिस्थितीकीय असंतुलन,जैव विविधतेमधील :हास, जैव विविधतेच्या :हासाची धोके, मानव-वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, हरित गृह परिणाम,  यांची वातावरणातील पातळी, अल्प पर्जन्य,महाराष्ट्रातील उष्मावृध्दी केंद्र (हीट आयलँड), पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरणावरील आघाताचे मुल्यमापन , क्वेट्टो संहिता व वातावरणातील कार्बन के्रडीट्स.
२.७ भुगोल आणि आकाश-अवकाशीय/अंतराळ तंत्रज्ञान: आकाश व अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली(जीआयएस), जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस)आणि दूर संवेदन यंत्रणा. देशाचे संरक्षण, बँकींग आणि अंतरजाळ (इंटरनेट) च्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञानयुग, दूरस्थ संपर्क प्रणाली(टेलीकयुनीकेशन). वाहतूक नियोजन-लोहमार्ग, रस्तेमार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था. आरोग्य आणि शिक्षण, भारतातील मिशन शक्ती, अँटीसॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्तीचं , अवकाश(स्पेस) संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्त्रो व डी.आर.डी.ओ. यांची भूमिका, अंतराळातील/अवकाशीय कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनितीक स्थिती.

२.८ अ) रिमोट सेन्सिंगची मुलभुत तत्वे :
• रिमोट सेन्सिंगची मुलभूत संकल्पना
• डेटा आणि माहिती
• रिमोट सेन्सिंग डेटा कलेशन
• रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा
• रिमोट सेन्सिंग प्रक्रिया
• इलेट्रो-चुंबकीय स्पेट्रम
• वातावरणासह उर्जा आणि पृथ्वीच्या ह्रश्वाृष्ठभागासह उर्जा परस्पर क्रिया (माती, पाणी, वनस्पती),
• भारतीय उपग्रह आणि सेंसर वैशिष्टये
• नकाशा रिझोल्युशन
• प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त
• दृश्यमान व्याख्य आणि डिजिटल डेटाचे घटक

• निष्क्रीय आणि सक्रीय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग
• मल्टीस्पेस्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग
ब) •एरियल फोटोग्राफ: • हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर • कॅमेराचे प्रकार आणि त्यांचे अनुप्रयोग • त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रिझोल्युशन • एरियल फोटोग्राफी व्याख्य आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी
क) जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग:
• भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय(जीआयएस)
• जीआयएस चे घटक
• भू-स्थानिक डेटा-स्थानिक आणि गुणधर्म डेटा
• समन्वये प्रणाली
• नकाशा अंदाज आणि प्रकार
• रास्टर डेटा आणि मॉडेल
•  डेटा आणि मॉडेल
• जीआयएस कार्ये- इनपुट कुशलता, व्यवस्थापन,  विश्लेषण आणि व्हिज्यूअलायझेशन
• जमीन वापर जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण
• डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम)
• त्रिकोणबध्द अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल (टीआयएन)
• नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आप्पती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे अर्ज

३. कृषि

३.१ कृषि परिसंस्था :
• परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्ये
• परिसंस्थेतील उर्जा प्रवाह
• परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म
• जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन, संवर्धित शेती
• नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका
• पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी.
• कार्बन क्रेडीट: संकल्पना, कार्बन के्रडीटची देवाण घेवाण, करार न जप्ती, महत्व, अर्थ आणि उपाय.
• पर्यावरणीय नितीतत्वे: हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, अल्प वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश (होलोकॉस्ट)आणि त्यांचा कृषि, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम, आकस्मिक पीक नियोजन
३.२ मृदा :
• मृदा एक नैसर्गिक घटक, मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय व भूमीशास्त्रीय संकल्पना
• मृदानिर्मिती: मृदा निर्मिती करणारे खडक आणि खनिजे
• मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके
• जमिनीचे-भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म

• जमीनीचा उभा छेद आणि मृदा घटक
• जमीन(मृदा) वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्त्रोत, आवश्यक आणि लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्ये, जमीनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्याची स्वरूपे
• जमीनीतील सेंद्रीय पदार्थ: स्त्रोत, स्वरूपे, गुणधर्म, जमीनीतील सेंद्रीय पदार्थावरील परिणामकारक घटक, सेंद्रीय पदार्थाचे महत्व आणि जमीनीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम.

• जमीनीतील सजीव सृष्टी: स्थूल आणि सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी. त्यांचे जमिन आणि वनस्पतीवरील लाभदायक .
• हानीकारक परिणाम जमिनीचे प्रदुषण: प्रदुषणाचे स्त्रोत, किटकनाशके, बुरशीनाशके,इत्यादींचे दुषित करणारे अजैविक घटक यांचा जमीनीवर होणारा परिणाम, जमीन प्रदुषणाचे प्रतिबंध आणि शमन.
• खराब/समस्याग्रस्त जमिनी आणि त्या लागवडी योग्य करण्यासाठी उपाययोजना
• रिमोट सेन्सींग आणि जीआयएस यांचा खराब/समस्याग्रस्त जमीनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरीता वापर
• जमिनीची धूप, धुपीचे प्रकार आणि धुप प्रतिबंधक उपाय
• सेंद्रय शेती
• अतिसुक्ष्म तंत्रज्ञान(नॅनो टेनॉलॉजी)आणि अचूक/काटेकोर शेती

३.३ जल व्यवस्थापन :
• जल विज्ञान चक्र
• पावसावलंबी आणि कोरडवाहू शेती
• जल संधारणाच्या पद्धती व महत्व
• पाण्याचा ताण/दुष्काळ आणि पीक निवारण
• पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे
• पाणलोट क्षेत्राची संकल्पना, उद्दिष्टे, तत्वे, घटक आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारी कारके
• सिंचनासाठी पाण्याची गुणवता, प्रदुषण आणि औद्योगिक दुषित पाण्याचा परिणाम
• पाणथळ जमिनीचे जलनिस्सारण
• सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष, पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता,
• नद्यांची आंतरजोडणी (नद्या जोड प्रकल्प),
• सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी
• सिंचन पध्दती आणि सिंचनाबरोबर/सिंचनाद्वारे खते देणे.

सामान्य अध्ययन – दोन
भारतीय संविधान व भारतीय राजकारण
(महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा

दर्जा : पदवी एकुण गुण : १५०                                                                                                                      प्रश्रपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ कालावधी : २ तास

टीप :
(१)प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.
(२) उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयांतील / उपविषयांतील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

१. भारताचे संविधान :
• संविधानाची निर्मिती प्रक्रिया,
• संविधानाची ठळक वैशिष्ट्ये,
• संविधानाचे तत्वज्ञान (धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी),
• मूलभूत हक्क,
• संपत्तीचं अधिकार मुलभूत अधिकार म्हणून वगळणे
• शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश.

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे –
• मूलभूत हक्क व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांच्यातील परस्पर संबंध
• कामाचा हक्क (मनरेगा),
• माहितीचा अधिकार.
• मूलभूत अधिकार व कर्तव्ये
• स्वतंत्र न्याय व्यवस्था,
• घटनादुरूस्तीची प्रक्रिया आणि भारतीय संविधानातील आजवरच्या प्रमुख घटना दुरूस्त्या.
• प्रमुख आयोग आणि मंडळाची रचना आणि कार्ये :
• निवडणूक आयोग
• केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग
• राष्ट्रीय महिला आयोग

• मानवी हक्क आयोग
• राष्ट्रीय अल्पसंख्य क आयोग
• अनुसूचीत जाती / अनुसूचीत जमाती आयोग
• नदी पाणी विवाद निवारण मंडळ
• केंद्रीय माहिती आयोग
२. अ) भारतीय संघराज्य व्यवस्था :
• कायदेविषयक विषयांचे वाटप: संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची,
• अवशेषाधिकार, कलम ३७०(रद्दबातल), कलम ३७१ आणि असममितीय संघराज्य व्यवस्था,
• राज्यांची भाषावार पुनर्रचना,
• प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आणि नव्या राज्यांची निर्मिती
• केंद्र राज्य संबंध: प्रशासकीय, कार्यकारी व विषयी संबंध
• राज्याराज्यातील संबंध : आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा
• निती आयेाग आणि आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरूप
• सरकारिया आयोगाच्या शिफारशी
ब) भारतीय राजकीय व्यवस्था (शासनाची संरचना, अधिकार व कार्ये) : भारतीय संघराज्याचे स्वरूप – संघराज्य व राज्य – विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याययंत्रणा, केंद्र – राज्य संबंध – प्रशासकीय, कार्यकारी व विषयी संबंध, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप
(१) सांघिक कार्यकारी मंडळ :
• राष्ट्रपती,
• उपराष्ट्रपती
• पंतप्रधान व मंत्रिमंडळ
• भारताचा महाधिवक्ता
• भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
(२) सांघिक विधिमंडळ :
• संसद
• सभापती व उपसभापती
• संसदीय समित्या
• कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण
(३) न्यायमंडळ :
• न्यायमंडळाची रचना, एकात्मीक न्यायमंडळ –
• सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार व कार्ये, दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय
• न्यायमंडळ- संविधानिक व्यवस्थेचे व मूलभूत अधिकाराचे संरक्षक.
• न्यायालयीन सक्रियता.
• जनहित याचिका.
३. भारतीय प्रशासनाचा उगम :
अ. ब्रिटिशपूर्व काळ
ब. ब्रिटिश काळ
क. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ
४. राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह) :
अ. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुर्नरचना
ब. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ
क. मुख्यसचिव, राज्य सचिवालय- कार्य व भुमिका विधानसभा
ड. विधीमंडळ, विधानसभा, विधानपरिषद – अधिकार, कार्ये व भूमिका
५. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन: स्थानिक शासनाची वैशिष्टये
(१) ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन :
अ. ग्रामसभा, ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद- रचना, अधिकार व कार्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक- कार्ये व भुमिका
ब. ७३ वी घटना दुरूस्ती – महत्व आणि वैशिष्टये
क. ग्रामीण विकास आणि पंचायती
(२) नागरी स्थानिक शासन व प्रशासन:
अ. नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद आणि कटक मंडळाची रचना, अधिकार व कार्ये. मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त-कार्ये व भुमिका
ब. ७४ वी घटना दुरूस्ती-प्रमुख वैशिष्टये
क. नागरी विकास व नागरी स्थानिक संस्था
६. जिल्हा प्रशासन :
अ. जिल्हा प्रशासनाचा उगम व विकास
ब. जिल्हा अधिकारी-अधिकार व कार्ये, जिल्हा अधिका:याची बदलती भूमिका, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि तलाठी-कार्य व भूमिका.
क. कायदा व सुव्यवस्था-कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा-जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक

७. पक्ष आणि हितसंबंधी गट :
• भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप
• राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष
• विचारप्रणाली
• संघटन

• पक्षीय निधी व
• निवडणुकीतील कामगिरी
• सामाजिक आधार
• महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबधी गट
८. निवडणूक प्रक्रिया :
• निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये
• एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ
• राखीव मतदारसंघ
• प्रौढ मताधिकार
• निवडणुक यंत्रणा: निवडणुक आयेाग व राज्य निवडणुक आयेाग
• लोकसभा व राज्यविधी मंडळासाठी निवडणूका
• स्थानिक संस्थांच्या निवडणूका
• खुल्या व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यामधील समस्या व अडचणी –
• निवडणूकविषयक सुधारणा – निवडणूक निधी व निवडणूकीतील खर्च
• इलेक्ट्राँनि मतदान यंत्रे
• व्ही व्ही पॅट
९. प्रसार माध्यमे :
• मुद्रण व इलेक्ट्राँनिक प्रसार माध्यमे – धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम, जनमत तयार करणे व लोकजागृती करणे;
• भारतीय वृत्तपत्र परिषद (प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया);
• जनसंपर्क प्रसारमाध्यमांसाठी आचारसंहिता;
• फेक न्युज व पेड न्युज,
• मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसारमाध्यमंामधील महिलांचा सहभाग : वस्तुस्थिती व मानके;
• भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा.
• सामाजिक माध्यमांमुळे निर्माण झालेली नवीन आव्हाने
१०. शिक्षण पद्धती :
• राज्य धोरण व शिक्षण याविषयीची निदेशक तत्वे;
• वंचित घटक – अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व महिला यांचे शिक्षणविषयक प्रश्न;
• शिक्षणाचे खाजगीकरण – शिक्षणाची उपलबध्दता , गुणवता , दर्जा व सामाजिक न्याय संबंधीचे मुद्दे,
• उच्च शिक्षणातील समकालीन आव्हाने,
• शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर इ-पाठशाला, इ.पीजी-पाठशाला,स्वयम
• सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान.
११. प्रशासनिक कायदा : कायद्याचे राज्य, विभाजन, प्रत्यायुक्त कायदे, प्रशासकीय स्वेच्छानिर्णय, प्रशासनिक न्यायाधिकरणे, नैसर्गिक न्यायाची तत्वे, दक्षता आयोग, लोकपाल आणि लोकायुक्त, लोकसेवकांना संविधानिक संरक्षण.
१२. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६: व्याख्य , जमीनीचे वर्ग व प्रकार, जमीनीचा वापर व वापर बदलासंबधी प्रक्रिया, जमीन महसुल निर्धारण, आकारणी व जमाबंदी, भूमिअभिलेख, अपिल, पुनर्रनिरीक्षण आणि पुनर्विलोकन संबधी तरतूदी.
१३. काही सुसंबद्ध कायदे :
(१) पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ : व्याख्य , उद्दिष्टे, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना.
(२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९: व्याख्य , उद्दिष्टे, बालकांचा शिक्षणाचा अधिकार , शासनाचे कर्तव्य तसेच शाळा व शिक्षकांच्या जवाबदा:या.
(३) माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ : व्याख्य , अर्जदाराचे अधिकार, सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य, माहिती मधील अपवाद, अपिल, शिक्षा.
(४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (सायबरविषयक कायदा) : व्याख्य , प्राधिकरणे, इलेक्ट्राँनिक शासन, अपराध आणि
शिक्षा.
(५) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८: व्याख्य, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना.
(६) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ : व्याख्य, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना.
(७) पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम २००७ : व्याख्य,उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाय योजना.
(८) नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ : व्याख्य उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना.
१४. समाज कल्याण व सामाजिक विधिविधान : सामाजिक-आर्थिक न्यायनिर्देशसबंधी घटनात्मक तरतूदी, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत महिलांचे संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार (प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत महिलांना संरक्षण, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत बालकांचे संरक्षण, मोफत कायदा सहाय्यता व जनहित याचिका संकल्पना.
१५. प्रशासन :
अ. अर्थसंकल्पीय प्रक्रिया : अर्थसंकल्प तयार करणे, कायदेशीर प्रक्रिया आणि अंमलबजावणी करणे.
ब. सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण: संसदीय नियंत्रण,  मंत्रालयाचे नियंत्रण, समित्यांद्वारे नियंत्रण- लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती
क. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक- कार्ये व भुमिका
१६. कृषि प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था :
अ. हरित क्रांती,
ब. धवलक्रांती
१७. सार्वजनिक सेवा :
अ. अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा व राज्य सेवा- संविधानिक दर्जा व कार्ये.
ब. भरती आणि प्रशिक्षण- भरती व प्रशिक्षणाचे प्रकार
क. प्रशिक्षण संस्था-लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी (यशदा) व भारतीय लोकप्रशासन संस्था (आयआयपीए),
ड. केंद्रीय सचिवालय- पंतप्रधान कार्यालय, मंत्रीमंडळ सचिव अधिकार, कामे आणि भूमिका
१८. घटनात्मक आणि वैधानिक संस्था :
अ. घटनात्मक संस्था- राज्य निवडणुक आयोग महाधिवक्ता
ब. वैधानिक संस्था: लोकपाल आणि लोकआयुक्त
१९. लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिध्दांत :
अ. संकल्पना- नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण  आणि ई-गव्हर्नन्स
ब. दृष्टिकोन- वर्तणुकात्मक दृष्टीकोन आणि व्यवस्था दृष्टीकोन
क. सिध्दांत- नोकरशाही सिध्दांत आणि मानवी संबंध सिध्दांत
२०. सार्वजनिक धोरण :
अ. सार्वजनिक धोरण- निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन आणि विश्लेषण,
ब. सार्वजनिक धोरणे आणि जागतिकीकरण,
क. भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया

राज्य सेवा (मुख्या) परीक्षा
सामान्य अध्ययन – तीन
मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

दर्जा : पदवी एकुण गुण : १५०                                                                                                               प्रश्रपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ कालावधी : २ तास

 

टीप :
(१)प्रश्रपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.
(२) उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयांतील / उपविषयांतील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

१. मानव संसाधन विभाग
१.१ भारतातील मानव संसाधन विकास : भारतातील लोकसंख्यची सद्यस्थिती – संख्यत्मक स्वरूप (आकारमान, वृध्दी,वृध्दीदर, लिंग, वय, नागरी आणि ग्रामीण लोकसंख्य, जन्मदर, मृत्युदर) आणि गुणात्मक स्वरूप (शिक्षण, आरोग्य, मानव विकास निर्देशांक, लोकसंख्य धोरण, लोकसंख्य विस्फोट, २०५० पर्यंतचे लोकसंख्य धोरण व नियोजन, आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्व आणि आवश्यकता, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेले विविध तत्व आणि घटक, भारतातील बेरोजगारीचे समस्या, स्वरूप आणि प्रकार, भारतातील रोजगार क्षेत्रातील कल, विभिन्न उद्योग विभाग आणि क्षेत्रातील कुशल कामगारांचे मागणी , बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचे धोरण व विविध योजना, मानव संसाधन व शिक्षण क्षेत्रात कार्य करणा:या विविध संस्था : एन.सी.ई.आर.टी, एन.आय.ई.ए, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), एआयसीटीई, एनसीटीई, आयआयटी,आयआयएम, एनसीव्हीटी, रूसा आयएमसी.)
१.२ शिक्षण : मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण) शिक्षण प्रणाली (शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी) समस्या आणि प्रश्र, मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या गरीब वर्ग, अधू, अल्पसंय, कौशल्य शोध इत्यादी, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणा:या शासकीय व स्वयंसेवी संस्था, ई-अध्ययन, जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी. शिक्षणाचा हक्क २००९, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ अद्ययावत केल्याप्रमाणे.
१.३ व्यवसायिक शिक्षण : मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यवसायिक शिक्षणाचा विचार, व्यावसायिक / तंत्र शिक्षण – भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सद्यस्थिती, शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम – समस्या, प्रश्र व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न, व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणा:या आणि अधिस्वीकृती देणा:या संस्था. हृस्ष्ठष्ट (राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ)
• राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम
• ग्रामीण भागात व्यवसायिक शिक्षण भेदण्याची रणनिती
• उद्योग संस्था भागीदारी (इंटर्नशिप आणि अॅपरेंटिसशिप)
• क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी एखाद्याने स्वत:चा उदयोग स्थिरस्थावर करणे,
• लहान वयात व्यवसायिक शिक्षणाचा परिचय (प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर १४+)
• सेवा क्षेत्रातील व्यवसायिक शिक्षण (आतिथ्य, रूग्णालये, पॅरामेडिस इ.)
• महिल सबलीकरणासाठी व्यवसायिक शिक्षण
• अद्यावत केल्याप्रमाणे व्यवसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम
• व्यवसायिक शैक्षणिक – शिक्षणचे राष्ट्रीय धोरण २०१९ (एनईपी २०१९)
१.४ आरोग्य : जागतिक आरोग्य संघटना – उद्देश, रचना कार्ये व कार्यक्रम, भारतामध्ये शासनाची आरोग्यविषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, भारतातील आरोग्य विषयक काळजी घेणारी यंत्रणा, भारतातील आरोग्यविषयक महत्वाची आकडेवारी, भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या (कुपोषण, माता मत्र्यता दर इ.) जननी – बाल सुरक्षा योजना, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पी.एम.एस.एस.वाय)

१.५ ग्रामीण विकास : पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, ग्रामपंचायतीची विकासातील भूमिका, जमीन सुधारणा व विकास, शेती आणि शेतकरी कल्याणविषयक विविध योजना आणि कार्यक्रम, ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामविकासामध्ये आंतर्राष्ट्रातअसणा:या विषयीसंस्था(एस.एच.जी.,सूक्ष्मवि, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना , मिशन अंत्योदया, ग्राम स्वराज्य अभियान.
२. मानवी हक्क :

२.१ जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर १९४८) : मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताच्या संविधानातील प्रतिबिंब, भारतात मानवी हक्क राबविण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित असलेल्यांच्या समस्या जसे गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा, हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, पोलीस कोठडीतील कैद्यांवरील अत्याचाराचा मुद्दा, लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सख्य तेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रांवरील परिणाम, मानवी विकास निर्देशांक, बालमृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर.
२.२ बाल विकास : समस्या व प्रश्न (अर्भक मृत्युसंख्य , कुपोषण, बाल कामगार, मुलांचे शिक्षण इत्यादी) – शासकीय धोरणे, कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम, बालविकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका, स्वयंसेवी संघटना, अशासकीय संस्था, सामुदायिक साधने, चाइल्ड लेबर- प्रोहिबिशन अँड रेग्यूलेशन , प्रोटेकशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम  ऑफेन्स , इंटीग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सव्र्हिसेस (आय.सी.डी.एस)
२.३ महिला विकास : महिलाविषयक समस्या व प्रश्न (स्त्री-पुरूष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, स्त्री अर्भक हत्या / स्त्रीभु्रण हत्या, महिलांचे सबलीकरण इत्यादी) महिला विकासासाठी शासकीय धोरण, योजना व कार्यक्रम, महिला विकास आणि महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय संघटनाची कार्ये, स्वयंसेवी संघटना आणि सामुदायिक साधने, अॅक्रीडीएटेड सोशल हेल्थ आक्टिविटी (अे.एस.एच.अे).
२.४ युवकांचा विकास : समस्या व प्रश्र (बेरोजगारी, असंतोष, अंमली पदार्थांचे व्यसन इत्यादी) शासकीय धोरण – विकास योजना व कार्यक्रम – आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामुहिक साधने, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड आंथ्रप्रेन्युरशिप, राष्ट्रीय युवा धोरण.
२.५ आदिवासी विकास : समस्या व प्रश्न (कुपोषण, एकात्मीकरण व विकास इत्यादी) शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम – आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना व सामूहिक साधने, जंगलविषयक अधिकार कायदा.
२.६ सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास : समस्या व प्रश्न (संधीतील असमानता इत्यादी) – शासकीय धोरण, कल्याण योजना व विकास कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवा संघटना व साधन संपत्तीचं संघटित करून कामी लावणे व सामूहिक सहभाग.

२.७ वयोवृद्ध लोकांचे कल्याण : समस्या व प्रश्न- शासकीय धोरण – कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि वयोवृद्धांच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन.
२.८ कामगार कल्याण : समस्या व प्रश्न (कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित समस्या) – शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम – आंतरराष्ट्रीय संस्था, समाज व स्वयंसेवी संघटना.
२.९ विकलांग व्यक्तींचे कल्याण : समस्या व प्रश्न (शैक्षणिक व रोजगार संधी यामधील असमानता इत्यादी) – शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम – रोजगार व पुनर्वसन यामधील आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका.
२.१० लोकांचे पुनर्वसन (विकास प्रकल्प व नैसर्गिक आप्पती यांमुळे बाधित लोक) : कार्यतंत्र धोरण व कार्यक्रम – कायदेविषयक तरतुदी आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय इत्यादींसारख्य निरनिराळ्या पैलूंचा विचार.
२.११ आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना : संयुक्त राष्ट्रे आणि तिची विशेषीकृत अभिकरणे – UNCTAD, UNDP, ICJ, ILO, UNICEF, UNESCO, UNCHR/UNHRC, APEC, ASEAN, OPEC, OAU, SAARC, NAM, Common wealth Nations, European Union, SAFTA, NAFTA, BRICS, RCEP.
२.१२ ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ : व्याख्य, उद्दिष्ट, विद्यमान अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये – ग्राहकांचे हक्क – ग्राहक विवाद वनिवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार – उद्दिष्ट्ये, अधिकार, कार्ये, कार्यपद्धती, ग्राहक कल्याण निधी, अपिल.
२.१३ मूल्ये व नीतितत्वे आणि प्रमाणके : सामाजिक प्रमाणकांची जोपासना – सामाजीकरण, कुटूंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमे इत्यादी यांसारख्य औपचारिक व अनौपचारिक संस्थांमार्फत सामाजिक मानके, मूल्ये, नीतितत्वे यांची जोपासना करणे.

राज्य सेवा (मुख्य) परीक्षा
सामान्य अध्ययन – चार
अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषि, विज्ञान व तंत्रज्ञान विकास

 

दर्जा : पदवी एकुण गुण : १५०                                                                                                             प्रश्रपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ , कालावधी : २ तास

टीप :
(१) प्रश्रपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.
(२) उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयांतील / उपविषयांतील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

१. समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र :
राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना- स्थूल देशांतर्गत उत्पादन- स्थुल राष्ट्रीय उत्पादन- स्थुल मूल्यवर्धन, घटक खर्चानुसार, बाजार किंमतीनुसार, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पध्दती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, व्यापारचक्रे. रोजगार संकल्पना- बेरोजगारीचे मापक.
१.२ वृध्दी आणि विकास :
विकासाचे निर्देशांक- विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक, समावेशक विकास, शाश्वत विकास- विकास आणि पर्यावरण, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, शाश्वत विकास उद्दीष्टये,
आर्थिक विकासाचे घटक: नैसर्गिक साधने, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भांडवल, लोकसंख्य – मानवी भांडवल- लोकसंख्य संक्रमणाचा सिध्दांत, मानव विकास निर्देशांक, लिंगभाव दरी, लिंगभाव सबलीकरण उपाययोजना, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, शासन. दारिद्रयविषयीचे अंदाज व मापन- दारिद्रयरेषा, मानवी दारिद्रय निर्देशंाक. उत्पन्न, दारिद्रय व रोजगार यांतील परस्पर संबंध- वितरण आणि सामाजिक न्यायाची समस्या, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम.
१.३ सार्वजनिक वित्त :
बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्तची/आयव्ययाची भूमिका (बाजार अपयश व विकासानुकूलता)- सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू, सार्वजनिक प्राप्तीचे/महसुलाचे स्त्रोत- करभार/कराघात व कराचा परिणाम, सार्वजनिक खर्चाचे प्रकार, अंदाजपत्रकीय तूट, राजकोषीय तूट – संकल्पना, तुटीचे नियंत्रण, सार्वजनिक कर्ज, कार्याधारित व शून्याधारित अर्थसंकल्प लिंगभाव आधारित अर्थसंकल्प.
१.४ मुद्रा/पैसा:
पैशाची कार्ये आधारभूत पैसा-उच्च शक्ती पैसा- चलनसंख्यमान सिध्दांत- मुद्रा गुणांक.भाववाढीचे मौद्रिक व मौद्रीकेतर सिध्दांत – भाववाढीची कारणे: मौद्रिकेतर, सिद्धांत- भाववाढीचे कारणे : मौद्रिक, राजकोषीय व थेट उपाययोजना
१.५ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल :
वृध्दीचे इंजिन- स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यापार- आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिध्दांत- अभिजात व आधुनिक सिध्दंात वृध्दीतील परकिय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका- बहुराष्ट्रीय कंपन्या.
आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था-आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था,आशियाई विकास बँक क्षेत्रीय व्यापार
करार-सार्क, आसियान. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक-व्यापारविषयक बौध्दिक संपदा आणि व्यापारविषयक गुंतवणूक उपाय.
२. भारतीय अर्थव्यवस्था :
२.१ भारतीय अर्थव्यवस्था- आढावा :
भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने- दारिद्रय, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल- निर्मुलनाचे उपाय. नियेाजन-प्रकार व तर्काधार, नियोजन आयोग, नीती आयोग. आर्थिक सुधारणा : पाश्र्वभुमी, उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण- संकल्पना, अर्थ, व्याप्ती व मर्यादा, केंद्र आणि राज्य पातळीवरील आर्थिक सुधारणा.
२.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास:
आर्थिक विकासात शेतीची भूमिका- शेती, उद्योग व सेवा क्षेत्रांमधील आंतरसंबंध, भारतातील कृषि विकासातील प्रादेशिक असमानता. शेतीचे प्रकार- कंत्राटी शेती- उपग्रह शेती- कॉर्पोरेट शेती-सेंद्रिय शेती. कृषी उत्पादकता- हरित क्रांती व तंत्रज्ञान विषयक बदल, जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, कृषी किंमत निर्धारण, कृषी विपणन, शेती पतपुरवठा व
नाबार्ड. जलसिंचन आणि जलव्यवस्थापन पशुधन आणि त्याची उत्पादकता- भारत व महाराष्ट्रातील धवल क्रांती, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन, पुष्पोत्पादन
विकास. कृषी अनुदान- आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय, सार्वजनिक वितरण व्यवस्था- अन्न सुरक्षा- कृषी विपणनावरील गॅट कराराचे परिणाम. ग्रामविकास धोरण ग्रामीण पायाभूत संरचना (सामाजिक आणि आर्थिक)
२.३ सहकार :
सहकाराची संकल्पना, अर्थ, उद्दिष्टे, सहकाराची नवीन तत्वे, महाराष्ट्र आणि भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण,स्वयंसहाय्यता गट, राज्याचे धोरण आणि सहकार क्षेत्र- कायदे, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य. महाराष्ट्रातील सहकार समस्या. जागतिक स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर सहकाराचे भवितव्य.
२.४ मौद्रिक व विषय क्षेत्र :
भारतीय विष व्यवस्था – संरचना, भारतीय रिझव्र्ह बँकेची भूमिका, मौद्रिक व पत धोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष्यभारतातील बँकिंग आणि बँकेतर वित्तसंस्थांचाविकास, नाणे बाजार-१९९१ नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार-१९९१ नंतरच्या घडामोडी, सेबीची भुमिका, वित्तय क्षेत्रातील सुधारणा.
२.५ सार्वजनिक वित्त आणि विषय संस्था : महसुलाचे स्त्रोत (केंद्रीय व राज्यस्तरीय), सार्वजनिक खर्च (केंद्रीय व राज्यस्तरीय)- वृध्दी व कारणे, सार्वजनिक खर्च सुधारणा- करसुधारणांचे समिक्षण- मुल्यवर्धित कर-वस्तू व सेवा कर, केंद्रीय व राज्यस्तरीय तूट आणि तूटीचा अर्थभरणा. सार्वजनिक कर्ज वृध्दी, घटक व भार, राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या ऋणभाराची समस्या, भारतातील वित्त आयोग, भारतातील वित्तय सुधारणा.
२.६ उद्योग व सेवा क्षेत्र :
आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्व व भूमिका, वृध्दीचे स्वरूप, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील मोठया उद्योगांची संरचना. सुक्ष्म, लहान व मध्यम उद्योग वृध्दी, समस्या, संभाव्य शक्यता व धोरणे. (एस.ई.झेड., एस.पी.व्ही) आजारी उद्योग – उपाय, औद्योगिक निकास धोरण. १९९१ च्या पुर्वीची व नंतरची औद्योगिक धोरणे, भारत व व्यवसाय सुलभता. भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृध्दी, भारतीय श्रम – समस्या, उपाय व सुधारणा, सामाजिक सुरक्षा उपाय

२.७ पायाभूत सुविधा विकास:
पायाभूत सुविधांचे प्रकार, ऊर्जा, पाणी पुरवठा व सफाई इत्यादी पायाभूत सुविधांची वृध्दी, गृहनिर्माण, वाहतूक , दळणवळण(पोस्ट व टेलिग्राफ, दूरसंचार), रेडिओ, दुरचित्रवाणी व इंटरनेटचे जाळे. भारतातील पायाभुत सुविधांसंदर्भातील समस्या पायाभूत सुविधांसाठीचा वित्त पुरवठा-आव्हाने व धोरण पर्याय, सार्वजनिक-खाजगी क्षेत्र भागीदारी. थेट परकीय गुंतवणूक व पायाभूत
सुविधा विकास, पायाभूत सुविधा विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधा संदर्भातील केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे-विशेष उद्देश साधणे, परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन
२.८ आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल : भारताच्या परकीय व्यापाराची वृध्दी, रचना आणि दिशा, परकीय व्यापार धोरण- निर्यात प्रोत्साहन  उपक्रम.
विदेशी भांडवल प्रवाह- रचना व वृध्दी, शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक इ. – व्यापार, परकीय व्यापारी कर्जे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था आणि भारत भारतातील विनिमय दर व्यवस्थापन.

२.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्टये, महाराष्ट्र सरकारची कृषि, उद्योग व सेवा क्षेत्रासाठीची धोरणे, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन – महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक. उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र.

२.१० कृषि : (१) राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषिचे महत्व : कमी उत्पादनक्षमतेची कारणे- राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये श्ेातीचे योगदान. मुलभूतशेतीविषयक निविष्ठाची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता, शेतक:याचे उत्पन्न दुह्रश्वपट करण्याबाबत शासकीय धोरणे. कृषी उत्पादनवाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणे आणि जमीन वापर, मृदा आणि जलसंधारण, पर्जन्य शेती,सिंचन आणि त्याच्या पध्दती, शेतीचे यांत्रिकीकरण. सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी. कृषि कर आणि जीएसटी.
आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषि विषयक विविध करार . पिक विमा योजना आणि त्यांची वाटचाल, भारतीय कृषि अनुसंधानपरिषद आणि महाराष्ट्र कृषि व संशोधन परिषद  यांची कृषि क्षेत्रातील कार्ये.
(२) ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषि पत पुरवठा :
• भारतीय कृषि क्षेत्रात कर्जाची गरज, भूमीका आणि महत्व, कृषि पतपुरवठयाचे वर्गीकरण, पुरवठा करणारे स्त्रोत, वाणिज्य आणि सहकारीबँक, नाबार्ड, ग्रामीण बँक इत्यादी संस्था, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान के्रडीट कार्ड योजना
• कृषि मूल्य- कृषि मूल्यांचे विविध घटक आणि विविध कृषि उत्पादनावर परिणाम करणारे घटक, कृषि मालांच्या विविध शासकीयआधारभूत किंमती, केंद्रीय कृषि मूल्य आयोग , शासकीय विविध कृषिमाल खरेदी, विक्री व साठवणूक करणाऱ्या संस्था.
• कृषि विपणन, बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रिकरण, कृषि विपणनामध्ये जोखमीचे प्रकार, कृषि विपणनात शासकीय संस्थांचीभुमिका.
२.११ अन्न व पोषण आहार : भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षिततेमधील समस्या, साठवणुकीतीलसमस्या व प्रश्र, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, भारतातील सामान्य पौष्टीक समस्या. शासकीय धोरणे, योजना जसे सार्वजनिकवितरण योजना, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना आणि इतर पौष्टीक कार्यक्रम यासारखे कार्यक्रम. हरित क्रांती आणि अन्नाच्याआत्मनिर्भरतेवर त्याचा परिणाम. खाद्य कार्यक्रमासाठी तेल पौष्टीक सुरक्षा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३.
३. विज्ञान व तंत्रज्ञान विकास

३.१ ऊर्जा विज्ञान:
पारंपारिक ऊर्जा स्त्रोत- जिवाश्म इंधन आणि ज्वलन , औष्णिक, जलविद्युत शक्ती (भरती व लहरी शक्ती), आवश्यक द्रव गतीशास्त्रऊर्जा रूपांतरणअपारंपारिक ऊर्जा स्त्रोत- परिचय, तत्व आणि प्रक्रिया-सौर, पवन, समुद्रलाटा, भूऔष्णिक, जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोह्रश्वलांटआणि इतर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत. उदा.-ऊस पिक इत्यादीचे उत्पादने, सौर साधने, सौर कुकर, पाणीतापक, सौरशुष्कयंत्र इत्यादी.भारतातील ऊर्जा संकट- शासन धोरणे व ऊर्जा निर्मिती कार्यक्रम औष्णिक व जलविद्युत निर्मिती कार्यक्रम, विज वितरण व विद्युत पुरवठा यंत्रणा-ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड, सौर विद्युत घटप्रणाली,उर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्था.
३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान :परिचय- संगणक हार्डवेअर, सॉफटवेअर, एक्स्सेसरीएस , कॉम्युनिकेशन, नेटवर्किंग-वायर्ड/वायरलेस, इंटरनेट, वेब टेनॉलॉजी,स्टॅटिक/डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग, नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान-लाऊड कंह्रश्वयुटींग, सोशल नेटवर्किंंग, लॉकचेन.इंटरनेट ऑफ थिंग्ज, आभासी वास्तव/संवर्धित वास्तव (व्हीआर/एआर), मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजीटल विषयी सेवा, कृत्रिमबुध्दिमता/मशीन लर्निंग(एआय/एमएल) शासकीय पुढाकार- मिडिया लॅब एशिया, डिजीटल इंडिया इ.
सुरक्षा- नेटवर्क आणि माहिती सुरक्षा, फॅारेन्सिक,सायबर कायदा.
३.३ अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान : भारतीय अंतराळ अभ्यास-धोरणे व कार्यक्रम, अंतराळ मोहिमा, इस्त्रो, भारतीय कृत्रिम उपग्रह,प्रस्तावना, कार्यतत्व, उपयोजन, उदा-दूरदर्शन प्रसारण, दूरसंचारण, हवामान अंदाज, जीपीएस, आपत्तीचं पूर्वानुमान, शिक्षण. उपग्रह प्रक्षेपक,अवकाश कचरा.सुदूरसंवेदन आणि त्यांचे उपयोजन- जीआयएस आणि त्याचे उपयोजन उदा.-अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा, व्यवस्थापन,पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गीका जाळे, भूभाग माहिती प्रणाली.
३.४ जैव तंत्रज्ञान :
३.४.१ प्रस्तावना: जैवतंत्रज्ञान, अति सुक्ष्मतंत्रज्ञानाची प्रस्तावना, संधी, वापर व स्वरूप, जनुक फुटन, पुनसयंत्रक डीएनए तंत्रज्ञान.
३.४.२ शेतीमध्ये(कृषि) जैवतंत्रज्ञान- प्रस्तावना, इतिहास, जैविक किटकनाशक, जैविक खते, जैव इंधन, पर्यावरण विषयक स्वच्छता, जैविकउपचार, जैवविविधतेचे संवर्धन.
३.४.३ वनस्पती उर्जा संवर्धन- आधुनिक तंत्रज्ञान, उपयोगिता, दुय्यम चयापचय.
३.४.४ प्रतिरक्षा विज्ञान- प्रतिरक्षानिदान तंत्रे, पशु पेशी तंत्रज्ञान.
३.४.५ डीएनए तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरीता उपयोगीता- जनुकीय परावर्तीत प्राणी, कृतक व मुळपेशी संशोधन, मनुष्याचे डीएनएचाचणी, मनुष्याची वैयक्तीक ओळख पटविण्याची कार्यपध्दती, उपयोजित मानवी जनुक विज्ञान पितृत्व चाचणी, जनुकीय समुपदेशन,वैद्यकशास्त्रामध्ये डीएनए तंत्रज्ञान, पेशीजननशास्त्र, रतजल जनुक विज्ञान, कर्करेाग आणि सुक्ष्मजीव संसर्गाचे निदान.
३.४.६ लसी- परंपरागत व आधुनिक जैवपध्दतीच्या लसी.
३.४.७ किण्वन-औद्योगिकदृष्टया महत्वपूर्ण किण्वन उत्पादने.
३.४.८ जैवनैतिकता- आरोग्यसेवेत जैवनैतिकता, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, जन्मपूर्व निदान, जनुकीय चाचणी, अनुवांशिक तपासणी, जनुकीयउपचार पध्दती, प्रत्यारोपन तंत्रज्ञान.
३.४.९ जैवसुरक्षा : जैवसुरक्षितता, विशिष्ट जीवांकरिता जैवसुरक्षेचे टप्प्यापे, जैवतंत्रज्ञान विभागाची मार्गदर्शक तत्वे.
३.४.१० एकाधिकार (पेटंट): प्रस्तावना, बौध्दिक मालमत्त अधिकार, पेटंटिग प्रक्रिया, पेटंट कायदा- प्रक्रिया व उत्पादन
३.५ भारताचे औष्ण्कि कार्यक्रम : प्रस्तावना, ठळक वैशिष्टये, आवश्यकता, अलीकडील आण्विक धोरणे, आण्विक चाचण्या, आण्विकऔष्णिक वीज निर्मिती-तत्व, रचना, कार्य आणि पर्यावरण (आण्विक कचरा, अपघात)भारतातील आण्विक विद्युत निर्मिती केन्द्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग उदा. ग्राहक उत्पादने, अन्न आणि शेती उत्पादने, वैद्यकीय औषधे इत्यादी.
३.६ आपत्ती व्यवस्थापन : व्याख्य , पर्यावरणीय तणाव,आपत्तचे वर्गीकरण.नैसर्गिक आपत्त- कारणे, परिणाम व उपाय योजना. भूकंप, त्सुनामी, महापूर, दरडी कोसळणे, अवर्षण, वणवा, वीजा कोसळणे.मानवी आपत्त- कारणे, परिणाम व उपाय योजना, वाळवंटीकरण, मृदा धूप, जंगले, शेती व घरांना लागणा:या आगी.दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया – बॉब स्फोट, नागरी भाग आणि दाट लोकवस्तींना लक्ष्य करून केलेले हल्ले.अपघात- पूल व पादचारी पूल कोसळणे,महाराष्ट्रातील विविध पूलांचे, इमारतींचे, धरणांच्या भिंतीचे स्ट्रचरल ऑडीट करण्याचीआवश्यकता, बांधकाम अंकेक्षण प्राधिकरणांचे गठण व त्यांची  आपत्तची ओळख/पूर्वकल्पना व वितरण, प्रभावक्षेत्र व धोके त्यांचेविश्लेषण, आपत्तविषयक जाणीवा, पूर्वानुमान, मदत कार्य व पुनर्वसन कार्य.

लेखी परीक्षेचा निकाल

1.वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमुद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक तीन चुकीच्या उारामागे एका प्रश्राचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
२. उमेदवाराने एखाद्या प्रश्राची एकापेक्षा जास्त उत्तरे दिली असल्यास सदर प्रश्राचे उत्तर चुकले असल्याचे समजून वरील परिच्छेद क्रमांक १ मधील तरतूदीनुसार गुण वजा करण्यात येतील
३. भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार मुलाखतीकरीता उपलबधहोतील, अशा रीतीने सर्व पेपरच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणांची किमान सीमारेषा निश्चित करण्यात येईल. सदर सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी तसेच महिला, दिव्यांग, खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी वेगवेगळी असेल.
४. प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा:या उमेदवारांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ते विहित अटींची पूर्तता करतात, असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येईल
५. प्रस्तुत लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त होण्याकरीता शतमत पद्धत लागू आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणा:या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राह्रश्वत करणारे उमेदवार मुलाखतीसाठी विचार करण्यासाठी पात्र असतील.
१) अमागास – किमान ३५ शतमत
२) मागासवर्गीय – किमान ३० शतमत
३) दिव्यांग – किमान २० शतमत
४) अत्युच्च गुणवताधारक पात्र खेळाडू – किमान २० शतमत
६. दिव्यांग अथवा अनाथ अथवा अत्युच्च गुणवताधारक पात्र खेळाडू या प्रवर्गाच्या किमान सीमारेषेच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा:या या उमेदवारास कोणतीही एकच सवलत घेता येईल.

पदांचा पसंतीक्रम

य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या व जाहिरात/अधिसूचनेत विहित केलेल्या अर्हता, अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांना संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने देणे आवश्यक राहील. अशा प्रकारे पसंतीक्रम नमूद करण्याची फक्त एकच संधी उमेदवारांस खालील अटींवर देण्यात येईल :
१) पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहील.
२) पसंतीक्रम आयोगास सादर केल्यानंतर पदाच्या पसंतीक्रमात बदल करण्यासंबंधीच्या विनंतीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
३) आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम सादर न केल्यास अधिसूचनेत नमूद केलेल्या पदक्रमांकानुसारच त्यांचा पसंतीक्रम आहे, असे समजण्यात येईल व त्यात नंतर बदल करण्याची संधी देण्यात येणार नाही.
४) संबंधित पदाकरीता विहित शारीरिक पात्रतेच्या अटी पूर्ण न करणा:या उमेदवारांनी संबंधित पदासाठी पसंतीक्रम नमूद करू नये.
५) दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णयान्वये दिव्यांग उमेदवारांना एखाद्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र ठरविले असल्यास त्याचा संबंधीत पदासाठी विचार केला जाणार नाही. याबाबतचा तपशील जाहिरात/अधिसूचनेमध्ये दिला जाईल

मुलाखत

1. विहित सीमांकन रेषेनुसार लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखत १०० गुणांची असेल
२. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/अधिसूचनेतील अर्हता/अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
३. विहित कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही तसेच त्याकरीता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

अंतिम निकाल

परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणची एकत्रित बेरीज करून गुणवता क्रमनुसार यादी तयार करण्यात येईल. सदर गुणवता यादीमधील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचा प्राधान्यक्रम उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये नमूद केलेल्या निकषानुसार किंवा कार्यनियमावलीतील तरतूदीनुसार ठरविण्यात येईल.

STATE SERVICES PRELIM EXAM – CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

state service exam STATE SERVICES PRELIM EXAM – CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES MAINS EXAM – CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES MAINS EXAM – CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES EXAM – FINAL RESULTS CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES EXAM – FINAL RESULTS CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES EXAM – DEPUTY COLLECTOR CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES EXAM – DEPUTY COLLECTOR CUT OFF MARKS ANALYSIS CATEGORY WISE

STATE SERVICES EXAM – DEPUTY COLLECTOR TOPPERS MARKS

STATE SERVICES EXAM – DEPUTY COLLECTOR TOPPERS MARKS

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

Quick Enquiry